SSC HSC Result 2022 Update : राज्यात नुकत्याच शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाचे वेध लागले आहेत . सदर निकाल वेळेतच लागणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे . विद्यार्थी पालकांनी चिंता करू नये , असे त्यांनी आवाहन त्यांनी यावेळी केले आहे . साधारपणे दरवर्षी १० जूनपर्यंत दहावीचा आणि १५ जूनपर्यंत बारावीचा निकाल लागावा यासाठी मंडळ नियोजन करीत आहे. ( SSC HSC Result 2022 Update )
- हेही वाचा – 12 वी सायन्स पास झाल्या नंतर काय कराल?
मात्र विनाअनुदानित शिक्षकांच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलनामुळे निकालाला लेटमार्क लागणार असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत . मात्र हे निकाल वेळेतच लागतील , असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. याशिवाय नव्या वर्षातील प्रवेश प्रक्रियाही नियोजनानुसार दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखा राज्य मंडळाकडून अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या नाही . निकाल वेळेत लागल्यास प्रवेशप्रक्रिया पार पडून सर्व महाविद्यालयांचे वर्ग ऑगस्ट – सप्टेंबर दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा