महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बरावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. SSC HSC 17 no. form examine fees
नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट पासून लागू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. हे नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होणार आहेत
राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात 50 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर 17 नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्कही महागलं आहे. 17 नंबरचा अर्ज/ फॉर्म भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 420 रुपयांवरून 470 रुपये केलं आहे. तर, 17 नंबरच्या फॉर्ममध्ये 30 रुपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात 110 रुपयांची वाढ केली आहे.