जगातील सर्वात सन्मानाचा समजला जाणारा नोबेल शांतता पुरस्कार 2022 ची घोषणा आज दि. 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विज्ञान आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकही जाहीर केले जाणार आहेत. ज्यांनी ” मानवजातीच्या सर्वात मोठ्या फायद्यासाठी ” काम केले आहे त्यांना बक्षिसे देण्यासाठी या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती . नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञाने नोबेल पारितोषिकासाठी आपली संपत्ती दान केली आहे.
जागतिक पातळीवर सर्वोच्च काम करणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्काराने सन्मानीत कारण्यात येते. सदर नोबेल शांतता पुरस्कार 1901 पासून दिला जात आहे , त्याचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. जगातील अनेक महान व्यक्तीना त्यांच्या विशेष, उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. यात भारतीयांचा ही समवेश आहे.
नोबेल शांतता पुरस्कार 2022 साठी काही व्यक्तींना प्रामुख्याने पसंती मिळाली आहे. यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा समावेश आहे, जे 2022 चे नोबेल शांततेचे पारितोषिक जिंकण्यासाठी आघाडीवर आहेत. याशिवाय फिलिपो ग्रँडी, निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांचे उच्चायुक्त देखील या यादीत आघाडीवर आहेत. त्याचबरोबर 2022 मध्ये स्वीयातलाना सिखानौस्काया , जागतिक आरोग्य संघटना , अॅलेक्सी नॅव्हल्नी , ग्रेटा थनबर्ग , सायमन कोफे , सर डेव्हिड अॅटेनबरो , भारतीय प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर , आणि म्यानमारचे राष्ट्रीय एकता सरकार इत्यादी व्यक्तींनाचा समावेश होतो.
दरम्यान यंदाच्या नोबेल 2022 पुरस्काराचे स्वरूप हे स्पष्ट कारण्यात आले असून विजेत्यांना प्रत्येकी सुमारे £ 800,000 इतकी रक्कम मिळणार आहे. त्यांनी त्यांची सर्व किंवा काही बक्षीस रक्कम त्यांच्या उद्योग किंवा धर्मादाय संस्था आणि प्रतिष्ठानांमध्ये पुढील संशोधनासाठी दान करणे अपेक्षित आहे.
FAQ
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
1 ) नोबेल शांतता पुरस्कार कधीपासून सुरू झाला?
नोबेल शांतता पुरस्कार 1901 पासून दिला जात आहे.
2) नोबेल शांतता पुरस्कार 2022 साठी निवडण्यात आलेले दोन भारतीय कोण आहेत?
प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर या दोन भारतीयांना 2022 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
Read article in English –
The Nobel Peace Prize 2022, considered the world’s most prestigious award, has been announced today. It will be held on October 7. The Nobel Prizes in the fields of science and economics will also be announced. The award was established to reward those who have worked “for the greatest good of mankind”. Nobel, a Swedish scientist, has donated his wealth for the Nobel Prize.
The Nobel Prize is awarded to the person who works at the highest level in the world. The Nobel Peace Prize has been awarded since 1901, five years after the death of its founder, Alfred Nobel. Many great people of the world have received this award for their special, outstanding work. This includes Indians.
Few individuals have been favored for the Nobel Peace Prize 2022. This includes Ukrainian President Volodymyr Zelensky, who is a front-runner to win the 2022 Nobel Peace Prize. Apart from this, Filippo Grandi, the United Nations High Commissioner for Refugees, also tops the list. Also included in 2022 are Sviatlana Sikhanauskaya, World Health Organization, Alexei Navalny, Greta Thunberg, Simon Coffey, Sir David Attenborough, Indian Prateek Sinha and Mohammad Zubair, and Myanmar’s National Unity Government.
Meanwhile, the nature of this year’s Nobel Prize 2022 has been revealed and the winners will receive around £800,000 each. They are expected to donate all or part of their prize money to further research in their industry or charities and foundations.