राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन संदर्भ क्र . १० अन्वये सर्वच शाळा दि . १० जानेवारी २०२२ ते दि . १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद करण्याचे आदशे निर्गमित करण्यात आले होते . तथापि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने इ . १ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून दि . ०७ फेब्रुवारी २०२२ पासून पुन्हा सुरु करणेबाबत या आदेशान्वये मंजूरी देण्यात येत आहे .
जिल्हयातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरु झाल्यानंतर उपययोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना साठी खाली दिलेले परिपत्रक पाहावे.