पी. एम. किसान योजनेचा माहे मे, २०२३ मध्ये वितरीत होणा-या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी केंद्र शासनाने खालील तीन बाबी बंधनकारक केल्या आहेत. लाभार्थीने पी.एम. किसान पोर्टलवर BENEFICIARY STATUS मधून तपासणी करून खालील बाबींची पूर्तता झाली असल्याची खात्री करावी. सदर बाबींची पूर्तता नाही झाल्यास हप्ता मिळणार नाही.
बाब | करावयाची कार्यवाही | जबाबदारी |
राज्याच्या भूमी अभिलेख | नोंदीप्रमाणे अद्ययावत करणे (Land Seeding – No) | आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित तहसिल कार्यालयास संपर्क साधावा. | संबंधित तहसिलदार |
पीएमकिसान ई-केवायसी | प्रमाणीकरण करणे | (ई-केवायसी झाले – नाही) | १. पी. एम. किसान पोर्टलवरील Farmers Corner मधील eKYC – OTP आधारीत सुविधेद्वारे e-KYC प्रमाणिकरण करून घ्यावे.
किंवा २. सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) किंवा ३. केंद्र शासनाच्या App द्वारे (Face Detection) |
संबंधित लाभार्थी |
बँक खाती आधार जोडणे (बँक खात्यासह आधार सीडिंग) | ९. बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्न (Aadhar Seeded) करून घ्यावे.
किंवा १. पोस्टमास्तर यांचेमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते उघडणे. |
संबंधित लाभार्थी |
यासाठी पी.एम. किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित न राहण्यासाठी वरील बाबींची तात्काळ पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा असे, राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष, पी.एम. किसान, महाराष्ट्र राज्य, कृषि आयुक्तालय, पुणे यांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.