बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चूक; विद्यार्थ्यांना मिळणार गुण!

बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चूक; विद्यार्थ्यांना मिळणार गुण!महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा मंडळाकडून इयत्ता 12 वीचे पेपर सुरु झाले आहेत. 9 हजार 635 परीक्षा केंद्रे असून, 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. दरम्यान बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना तो प्रश्न सोडवताना अडचणी आल्या होत्या.

विद्यार्थ्यांनी थेट बॉर्डकडे तक्रार केल्याने आता त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान तक्रारी नंतर बोर्ड अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Maha Board Exam 2022 -दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक उपलब्ध!

Maha Board Exam 2022 -दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी क्वेश्चन बँक उपलब्ध!It has now been decided that the 10th-12th exams will be held offline. Therefore, students need to have more writing practice in the exams (10th 12th board exams 2022). The question paper has been prepared by the State Institute of Educational Research and Training (SCERT) and will be made available to the students free of cost on the SCERT website.
The purpose behind this is to give them an idea of ​​the questions to be asked in the exam, to get extra practice.
Subject wise question papers have been uploaded on the website http://www.maa.ac.in.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षांमध्ये (10th 12th board exams 2022) विद्यार्थ्यांचा लेखन सराव जास्त होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (SCERT) ही प्रश्नपेढी तयार करण्यात आली असून, ती विद्यार्थ्यांना ‘एससीईआरटी’च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
त्यांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा,जास्तीचा सराव व्हावा हा उद्देश या माघे आहे.
http://www.maa.ac.in या वेबसाइटवर विषयनिहाय प्रश्नपेढी अपलोड करण्यात आल्या आहेत.

प्रश्नपेढी 2021-2022

प्रश्नपेढी पाहण्यासाठी खालील इयत्तेला क्लिक करा.

इयत्ता १० वी प्रश्नपेढी

इयत्ता १२ वी प्रश्नपेढी

दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता!

दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता!शैक्षणिक अपडेट : शिक्षण विभागाकडून डिसेंबर महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले . त्यानुसार , बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या दरम्यान तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान होणार आहे . यासंदर्भातील घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात होण्याची चिन्हे आहे . यासंदर्भात झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर येते आहे .

याबाबत परीक्षा पुढे ढकलणे योग्य ठरणार असणार आहे कारण गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय कमी झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लिखाण सर्वासाठी आणखीन वेळ मिळणे आवश्यक असल्याचे म्हणणे विद्यार्थी व पालक वर्गातून पुढे येते आहे.
दरम्यान याची दखल शिक्षण विभाग व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलाव्यात , असे कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आहे . उपसंचालकांची आज ऑनलाईन बैठक झाली . त्यावेळी त्यांनी ही सूचना केली आहे .
थोडक्यात महत्वाचे –
परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रका नुसार

बारावीचा परीक्षा कालावधी – 4 मार्च ते 7 एप्रिल तर
दहावीचा परीक्षा कालावधी – 15 मार्च ते 18 एप्रिल

  • वेळापत्रकानुसार
    इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक , श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येतील .
  • लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होतील . तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल असा असेल .
  • प्रात्यक्षिक , श्रेणी / तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील .
    बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जूनच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल .
  • दहावीच्या प्रात्यक्षिक , श्रेणी व तोंडी / अंतर्गत गुणांच्या परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येतील .
  • लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होतील .
  • तर प्रात्यक्षिक , श्रेणी / तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 5 ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील

Read more