शासकीय नोकरीत खेळाडूंना ५% आरक्षण ठेवण्यात आले असून, या अंतर्गत अनेक खेळाडू उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ मिळावीला आहे. सध्या काही उमेदवारांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. शासकीय सेवेचा लाभ घेत सध्या कार्यरत आहेत. आशा उमेदवारांना सदर शासकीय विभागाकडून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र , बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
“बोगस क्रीडा प्रमाणपत्र , बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” नेमकी कशी आहे?
सदर योजने नुसार या निमित्ताने उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना
तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा प्रमाणपत्र व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तिश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पित करण्यात यावीत असे अहवान करण्यात आले आहे.
सदर उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.
मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधित उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल.
बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा. असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे श्री ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले आहे. राज्यात भरती प्रक्रिया घोटाळ्यामुळे गाजत असतानाच क्रीडा विभागाने बोगस क्रीडा प्रमाणपत्र विषयी चालू केलेली कार्यवाहीमधून अनेक बोगस प्रमाणपत्र धारक समोर येण्याची दाट शक्यता आहे.