महाराष्ट्र राज्य वीज वितरणमध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज.

Mahavitaran Recruitment : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये तब्बल 5347 जागा भरण्यात येणार आहेत. सदर भरतीची जाहिरात अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची सुरुवात 1 मार्च 2024 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
Mahavitaran advertisement for 5347 posts

एकूण जागा : 5347

पदाचे नाव : विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : 1) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) 2) आयटीआय (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेला 2 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक : 5 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: 250 रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ :125 रुपये ]

पगार :

  • प्रथम वर्ष – एकूण मानधन 15,000 रुपये
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन 16,000 रुपये
  • तृतीय वर्ष – एकूण मानधन 17,000 रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

परीक्षा : आॅनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

भरतीची जाहिरात : क्लिक करा