सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर , पगारात होणार ” इतकी ” वाढ! 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर , पगारात होणार " इतकी " वाढ! शासन निर्णय : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ देत महागाई भत्ता 34 टक्क्यांवर नेला होता.त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सध्यस्थिला 31 टक्के महागाई भत्ता (DA) मिळतो. काही दिवसांपूर्वी केंद्राच्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत होता. मात्र, आता तो 34 टक्के झाला आहे.. तसाच निर्णय आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यासाठी घेतला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांनाही आता 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

17 लाख कर्मचाऱ्यांना होणार थेट लाभ…

राज्य सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाचा मुळे राज्य शासनाच्या सेवेतील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे. महाराष्ट्र शासनातील कर्मचाऱ्यांसोबतच जिल्हा व नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगाचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. यानुसार क्लास -1 अधिकाऱ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. अधिकाऱ्यांच्या वेतनात 30 ते 40 हजार रुपयांची वाढ होणार आहे. तर क्लास-2 मधील अधिकाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा फायदा होईल. याशिवाय क्लास-3 मधील अधिकाऱ्यांना 10 ते 15 हजार रुपयांचा फायदा वेतनात होणार आहे.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे.

लवकरच तिसरा हप्ता कर्मचाऱ्यांना मिळणार…

दरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ‘एरियर’ म्हणून 5 हप्ते देण्याचीही घोषणा केली होती. यानुसार सरकारकडून आतापर्यंत 2 हप्ते देण्यात आले असून, आता लवकरच तिसरा हप्ता या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.