महाराष्ट्रात होमगार्डमध्ये ९,७०० पदांसाठी भरती;१० वी पास उमेदवार पात्र.

महाराष्ट्रात होमगार्डमध्ये ९,७०० पदांसाठी भरती;१० वी पास उमेदवार पात्र.महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत ३४ जिल्ह्यातील एकूण ९७०० होमगार्ड पदासाठी भरती केली जाणार असून या संदर्भातले एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार दहावी पास उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. सध्या राज्यात होमगार्ड जवान या पदासाठी ९७०० जागा रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लवकरच होमगार्ड भरती केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत १६ ऑगस्ट २०२४ पासून या भरतीची सुरुवात होणार आहे. होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.

  • पात्रता :
    २० ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
  • शारिरीक विकलांग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही.
  • या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यात नोकरी मिळणार आहे.त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही.
  • याबाबत अर्ज प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.