राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी मध्ये “दिवाळी बोनस” जाहीर केला आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय.एस. चहल, माजी आमदार किरण पावसकर आदी उपस्थित होते.
मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अनुदानित शाळांतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत बैठकीत चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये दिवाळी बोनस देण्यात येणार येणार आहे. तर आरोग्य सेविकांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या निर्णयाचा मुंबई मनपाचे ९३ हजार, बेस्टचे २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविकांना होणार लाभ होणार आहे.