सोलापूर नोकरी : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आस्थापनेवरील पदासाठी थेट भरती, शैक्षणिक पात्रता 12 वी व पदवीधरांना संधी.

सोलापूर नोकरी : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आस्थापनेवरील पदासाठी थेट भरती, शैक्षणिक पात्रता 12 वी व पदवीधरांना संधी.मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पदे ( प्रशिक्षणार्थी ) भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेणेकरीता पात्रता व निकष निश्चित करण्यात आले असून, उमेदवारांनी विहित कालावधी दिलेल्या ठिकाणी हजर राहायचे आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी.

पात्रता व निकष.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय / पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी असावी. मात्र शिक्षण चालु असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय १८ ते ३५ वयोगटामध्ये असणे आवश्यक आहे.

इतर महत्वाचे :

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा. उमेदवारांची आधार नोंदणी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
  • विद्यावेतन :
  • १२ वी : ( रु. ६,०००/-),
  • डिप्लोमा / आयटीआय : ( रु.८,०००/- )
  • पदवी : (रु.१०,०००/-) विद्यावेतन शासनाकडून देण्यात येईल. उमेदवाराकडे MS-CIT, मराठी आणि इंग्रजी ३० व ४० प्र.श.मि. इ. बाबतचे प्रमाणपत्र असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रशिक्षणार्थीची नियुक्ती कोणत्याही विशिष्ट पदावर करावयाची नसून ती “प्रशिक्षणार्थी’ म्हणून असेल..

How to Apply –

इच्छुक व पात्र उमेदवारांनी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, कागदपत्रे व स्वतःचे शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल येथे दि. ०९/०९/२०२४ रोजी १०.०० वा. हजर रहावे.