मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा नवीन GR आला, आता सर्वांनाच मिळणार १५०० रुपये, कागदपत्राचे नो टेंशन | Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा नवीन GR आला, आता सर्वांनाच मिळणार १५०० रुपये, कागदपत्राचे नो टेंशन | Mukyamantri Mazi Ladki Bahin Scheme‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र कागदपत्रे जमा करतांना नागरिकांची दमछाप होत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन, शासनाने आता आज दिनांक 12 जुलै 2024 रोजी नवीन सुधारित जीआर आणला असून, या अंतर्गत अनेक कागदपत्रे कमी करून, महिलांना दिलासा देण्यात आला आहे. का हे नवीन सुधारित जीआर हे जाणून घेऊया.

शासन निर्णय क्रमांकः मबावि-२०२४/प्र.क्र.९६/का-०२

शासन निर्णय :-

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलबाबींची स्पष्टता करण्यात येवून त्यास मान्यता देण्यात येत आहे:-

कुटुंबाची व्याखा :- सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याखा खालीलप्रमाणे राहील.

कुटुंब” याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले/मुली.

२. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.

३. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे (१) जन्म दाखला किंवा (२) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा (३) अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड व १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे.

४. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे.

५. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे.

६. सदर योजनेतंर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका /अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.

७. केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS-DBT प्रणालीव्दारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र/राज्य शासनाच्या विविध योजनांमधील (उदा.PM-KISAN, POSHAN, MGNREGS, PM-Svanidhi, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना) जे लाभार्थी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील, त्यांचा DATA माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व Aadhaar Authentication यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्याना केवळ ऑफलाईन अर्ज भरुन घेवून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र, हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरुन घेण्यात यावा.

८. गावपातळीवर ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची “ग्रामस्तरीय समिती” स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करुन त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश अॅप/पोर्टलवर भरण्यात यावेत.

शासन निर्णय क्रमांकः मबावि-२०२४/प्र.क्र.९६/का-०२

९. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात यावी. सदर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे. तसेच व्दिरुक्ती (Duplication) टाळण्यात यावी.

१०. शासन निर्णय दि.०५.०७.२०२४ अन्वये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीसाठी “अ+”, “अ” व “ब” वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने, या महानगरपालिका क्षेत्राकरीता “तालुकास्तरीय समिती” ऐवजी “वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती आता “अ+”, “अ” व “ब” वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादीत न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी.

११. तालुका/वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करुन लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे.

१२. नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका /अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु.५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे.

१३. सदर शासन निर्णय दि.११.०७.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

१४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०७१२१४०१५९४२३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

नवीन सुधारित जीआर डाउनलोड करा – 

येथे क्लिक करा

Ladki Bahin Scheme: ‘लाडकी बहीण’साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?

Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण'साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट असणार आहे. त्यापूर्वीच महिलांना अर्ज करावी लागणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही कागदपत्रांची पुर्तता करणेही आवश्यक आहे. विशेष म्हणजे या योजनेत काही बदल देखील करण्यात आली आहेत. आता हा अर्ज तुम्हाला मोबाईल अँप मार्फत सुद्धा भरता येणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी असा करा अर्ज?

पायरी 1 

गुगल प्लेस्टोअर वरून “नारी शक्ती दूत ” अँप डाउनलोड करा.

Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण'साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?

 

पायरी 2

ज्या महिलेचा फॉर्म भरायचा त्यांचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे.

Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण'साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?

पायरी 3

लाडकी बहीण योजना ऑप्शन निवडून फॉर्म भरायला सुरुवात करावी 

Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण'साठी आता घरबसल्या करता येणार अर्ज! नवं अ‍ॅप सुरु; जाणून घ्या कसा भरायचा अर्ज?

या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने महिलेला सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहावे लागले. जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नानंतरचे संपूर्ण नाव लिहावे लागेल.

 

पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे देखील आवश्यक आहे. जन्माचे ठिकाण आणि पिनकोड लिहिले देखील आवश्यक आहे. मोबाईल नंबर आणि आधारकार्ड नंबर देखील आवश्यक आहे. या अर्जामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न विचारण्यात आलाय की, इतरही कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहे का? असेल तर हो तिथे लिहावे लागेल. अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दलही महिलांना माहिती द्यावी लागेल.

 

यासोबतच बॅकेची संपूर्ण माहिती आणि बॅकेचा क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे. ते व्यवस्थितपणे द्यावे लागेल. बॅक क्रमांक आधारकार्डला जोडला आहे का? हे देखील अर्जात विचारण्यात आले आहे. यासोबत भरलेला अर्ज आपल्याला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून तपासून घेऊ शकता.

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे अपलोड करा 

आधार कार्ड, अधिवास\जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बॅंक पासबुक आणि यासोबतच अर्जदाराचे फोटोही आवश्यक आहे.