विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाची मोठी घोषणा.!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाची मोठी घोषणा.!राज्यातील सर्व इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाबाबत महत्वाची घोषणा शिक्षण विभागाकडून नुकतीच करण्यात आली आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावमुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला होता. शाळा बंद ठेवून ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षक मंडळी कडून कारण्यात आला. त्यावेळी शालेय विभागाने इयत्ता नुसार अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी कारण्यात आला होता.

शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 मध्येही पहिली ते बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम (पाठ्यक्रम) कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झालाय. परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळा 15 जूनपासून ऑफलाईन पद्धतीने सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता अभ्यासक्रमात सूट या वर्षी दिली जाणार नाही.

शालेय शिक्षण विभागाने नुकताच मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून पहिली ते बारावीसाठी 100 टक्के अभ्यासक्रम लागू असणार आहे. शासनाने नुकतीच या निर्णयास मान्यता दिल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

शिक्षकांसाठी सर्वात मोठी बातमी, शाळा सुधारण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून विविध घोषणा!

शिक्षकांसाठी सर्वात मोठी बातमी, शाळा सुधारण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून विविध घोषणा!शैक्षणिक अपडेट 2022 : राज्यातील सरकारी शाळांचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी (ता. 21) काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं, यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विविध मोठमोठ्या घोषणा करीत महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे सांगितले. यामध्ये शाळांमधील मुलभूत सोयींसाठी राज्य सरकारकडून यंदा पहिल्यांदा जिल्हा नियोजनमार्फत (DPTC) पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षकांसाठी मोठी घोषणा

दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांसाठीही मोठी घोषणा केली. शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना ‘फिनलँड’ आणि ‘ऑस्ट्रेलिया’ या देशांमध्ये ट्रेनिंग दिलं जाणार असल्याची माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली.

सरकारकडून कारण्यात आलेल्या महत्वाच्या घोषणामध्ये खालील बाबींचा समावेश होतो- 

  • मुलांना भौतिक सुविधा पुरवतानाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही राज्य सरकार काम करीत असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
  • निजामकालीन शाळांसाठी यावर्षी एकूण 160 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
  • आदर्श शाळांसाठी या वर्षी 54 कोटी, तर पुढील वर्षी 300 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.
  • प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे.
  • यंदा विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर आणि लँग्वेज लॅबची सोय करण्यात येणार आहे.
  • यंदा विभागीय स्तरावर ‘सायन्स सिटीज्’ तयार करण्यात येणार आहेत. तसेच ‘इंटिग्रेटेड’ आणि ‘मराठी- इंग्लिश’ अशा भाषांमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.
  • शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे.
  • विद्यार्थ्यांना ‘गुड टच’ (good touch) आणि बॅड टच (bad touch) बाबत शिक्षण दिलं जाणार..