राज्यात इयत्ता १ ली ते १० वी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात ” नवीन विषयाचा ” समावेश होणार…..

राज्यात इयत्ता १ ली ते १० वी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात " नवीन विषयाचा " समावेश होणार.....

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात लवकरच नवीन कृषी विषयाचा समावेश होणार असून, तो विषय इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचा भाग असणार आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे.

दरम्यान यासंदर्भातील रीतसर अहवाल आज मंत्री श्री. सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कृषी केंद्रीत आशयामुळे विदयार्थ्यांचे शेतीचे अध्ययन होऊन त्यांचा शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी सदर विषयाचा समवेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

कृषी विषया अंतर्गत कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे . कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते कृषी विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.