शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात महत्वाचे अपडेट, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा !

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात महत्वाचे अपडेट, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा !

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. माघील अनेक दिवसापासून राज्य सरकार राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्याबाबत विचार करत होत. मात्र अशातच आता राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत. अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

दरम्यान शिक्षकांच्या बदल्या विषयी पुढे बोलताना त्यांनी, या बदल्या न करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो. ही बाब विचारात घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांतील शिक्षकांच्या नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत. मात्र जर एखाद्या शिक्षकाला बदली करायचीच झाल्यास त्यासाठी विशेब बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिक्षकांच्या नियमित बदल्या आदेश लवकरच काढण्यात येणार

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात लवकरच आदेश काढण्यात येणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभाग, शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. शालेय जीवनात मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यात शिक्षकांची भूमिका देखील महत्त्वाची असते. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे शिक्षक त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे मोलाचे काम करत असतात. मात्र दर तीन वर्षांनी शिक्षकाची बदली झाली तर यामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे यापुढे नियमित बदल्या न करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला असल्याचे सांगितले.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे शासननिर्णय रद्द; शिक्षकांच्या बदल्या लांबणार, सविस्तर वृत्त वाचा .

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे शासननिर्णय रद्द; शिक्षकांच्या बदल्या लांबणार, सविस्तर वृत्त वाचा .

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यां संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य शासनाने यापूर्वी काढलेले सर्व शासननिर्णय रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे पुढील वर्षाच्या बदल्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत शासन निर्णय काढण्याच्या दृष्टीने सल्ला देण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारी संपामुळे सध्या सुरू असलेली प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू राहणार की, थांबणार यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने 4 एप्रिल 2020 रोजी शासननिर्णय जारी केला. शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. हा शासननिर्णय रद्द करण्यात आला आहे. 7 एप्रिल 2021 रोजीच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय बदलीप्रक्रियेचा अभ्यास करून त्यामध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यात काय सुधारणा कराव्यात, या संदर्भात धोरण निश्चित करणे गरजेचे आहे.

याबाबतचा अभ्यास करून त्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी शासनाने स्वतंत्र अभ्यासगट गठीत करण्यात करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे हे अध्यक्ष आहेत. समितीत नाशिक बीड, उपसचिव, जिल्हा परिषद आस्थापना, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तर, सचिव म्हणून अवर सचिव, आस्था 14 कार्यासन, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई असणार आहे.

शिक्षकांच्या बदल्या लांबणार

बदल्यांचा शासननिर्णय रद्द करण्यात आल्यामुळे नवीन शासननिर्णय येईपर्यंत शिक्षकांना बदल्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मार्च अखेरपर्यंत निवेदने स्वीकारली जाणार असल्याने त्यानंतर अभ्यासगट योग्य त्या शिफारसी करेल. शासनाने अभ्यासगटाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर शासननिर्णय काढण्यात येईल व त्यानंतरच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे या प्रक्रियेसाठी किती कालावधी लागणार आहेत, हे निश्चित नसल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

शिक्षक बदल्यासाठी अभ्यासगटाची स्थापना

या अभ्यासगटाने प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच, काम करताना त्यांना बदल्यांसंदर्भात येणाऱया अनुभवांचा उपयोग करून व प्रातिनिधिक शिक्षक संघटनांकडून चर्चेमधून प्राप्त होणारी माहिती या संदर्भातील विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेले निर्देश, संगणकीय प्रणाली तयार करणाऱया अधिकाऱयांना 2022ची प्रक्रिया राबविताना आलेल्या अडचणी, 2022ची प्रक्रिया राबविताना शासनाने वेळोवेळी दिलेली स्पष्टीकरणे, याचा तौलनिक अभ्यास करून वरील शासननिर्णयानुसार कार्यान्वित असलेल्या बदल्यांच्या धोरणासंदर्भात आवश्यक त्या शिफारशी करणे.

2023च्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचे संभावित वेळापत्रक सादर करणे अभिप्रेत आहे. याबाबतचा अहवाल या अभ्यासगटाने एका महिन्यात शासनास सादर करावयाचा आहे. या अभ्यासगटाच्या विचारार्थ सादर करावयाची निवेदने 27 ते 29 मार्च या कालावधीत ग्रामविकास विभागाकडे सादर करावीत. त्यानंतर प्राप्त झालेली निवेदने विचारात घेतली जाणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

तिसरीच्या विद्यार्थाची वार्षिक परीक्षा होणार, राज्यात “केरळचा शैक्षणिक पॅटर्न” राबविला जाणार.

इयत्ता तिसरी विद्यार्थी

शैक्षणिक अपडेट : राज्यात शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने सरकार राज्यत शिक्षणाचा ‘ केरळ पॅटर्न ‘ राबविण्याच्या तयारीत आहे. सदर पॅटर्न नुसार पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थाची वार्षिक सराव परीक्षा सुरू कारण्यात येणार आहे . त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील . सध्य शैक्षणिक पद्धती नुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धती लागू नसून, मूल्यांकन पद्धतीचा वापर करुन विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात पाठविले जात आहे .

शिक्षण विभागाच्या माहिती नुसार सध्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण राज्यातील अधिकारी राजस्थान , गुजरात आणि केरळमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत असल्याची माहिती शिक्षण संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र व इतर राज्यातील शैक्षणिक फरक काय?

महाराष्ट्रात ८ वी पर्यंतच्या परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत ; पण शेजारच्या राजस्थानमध्ये ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डामार्फत परीक्षा घेतल्या जात आहेत . तर गेल्या वीस वर्षांपासून पंजाबमध्ये परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची बँक आहे . केरळमध्येही इंग्रजी शिक्षणासाठी खासगी शिक्षण संस्थांना पसंती दिली जाते . इंग्रजीसह स्थानिक भाषेमधून शिक्षण घेण्याचे प्रमाण अधिक आहे ; पण तितकाच विश्वास सरकारी शिक्षणावरही आहे . त्यामुळे तेथील प्राथमिक विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत आघाडीवर आहेत .

दरम्यान तिसरी पासून परीक्षा पद्धतीचा अवलंब झाला तरी सराव परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास किंवा गुण कमी मिळाल्यास विद्यार्थांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल , पण त्याला पुढील वर्गात जाण्यापासून रोखले जाणार नाही , असेही पगारे यांनी स्पष्ट केले .

केरळ शैक्षणिक पॅटर्न नेमका काय आहे?

१ ) प्राथमिक शाळा चालविण्याचे व नोकरभरतीचे अधिकार ग्रामपंचायतींना .
२ ) माध्यमिक शाळांचे अधिकार जिल्हा परिषदांना .
३ ) प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा .
४ ) कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा .

५ ) दर दहा वर्षांनी अभ्यासक्रमात बदल .
६ ) प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक , वडील आणि माता असोसिएशन .
७ ) विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी कुटुंबश्री योजना .
८ ) विभागीय स्तरावर कला आणि विज्ञान मेळावा .

९ ) विद्यार्थी लेखकास प्रोत्साहन .

१० ) जनावरांच्या डॉक्टरांच्या नियुक्तीचे अधिकारही ग्रामपंचायतींना .