शाळांच्या संचमान्यतेसाठीची ‘आधार’ची सक्ती अखेर शिथिल, शिक्षकांच्या नोकऱ्यांवरील संकट अखेर टळले

शाळांच्या संचमान्यतेसाठीची 'आधार'ची सक्ती अखेर शिथिल, शिक्षकांच्या नोकऱ्यांवरील संकट अखेर टळले

राज्यातील अनुदानित शाळांची संचमान्यता बाबत शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनुदानित शाळांमध्ये १३ लाखांहून अधिक आधार कार्ड आणि त्याबाबत विसंगती आढळल्या आहेत. शेकडो शाळांची संचमान्यता आता केवळ विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांच्या हजेरीच्या तपासणीवरून केली जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने संस्थाचालकांच्या दबावापुढे संचमान्यतेसाठी ‘आधार’ची सक्ती शिथिल करण्याचा निर्णय शासनकडून घेतला आहे.

संचमान्यतेमध्ये आता सरसकट विद्यार्थ्यांची नोंदणी होणार

संचमान्यतेमध्ये आता सरसकट विद्यार्थ्यांची नोंदणी होणार असल्याने हजारो शिक्षकांच्या नोकऱ्याही सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील शाळांमधील किमान ८० टक्के विद्यार्थ्यांचे ‘आधार’ वैध असल्याचे विचारात घेऊन शाळांची अंतरिम संचमान्यता करण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांच्या नावातील तफावत किंवा अन्य कारणांमुळे ते अवैध ठरले आहेत. काही विद्यार्थ्याकडे आधार कार्डच नाही; तरीही ते शाळेत येत आहेत. त्यांना संचमान्यतेत गृहीत न धरल्यामुळे त्याचा फटका शिक्षकांच्या मंजूर पदांना बसत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची संख्याही संचमान्यतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जुळलेले नाही; परंतु त्यांची नोंद शाळांमध्ये आहे त्यांची तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख भेट देऊन करणार असल्याचे विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची शाळेतील नियमित हजेरी ग्राह्य धरून संचमान्यता केली जाणार आहे. त्यांचे आधार कार्ड का काढले नाही, याची मात्र चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे अनुदानित, सरकारी आदी शाळांमधील एखादा विद्यार्थी स्टुडंट पोर्टलवर ‘डुप्लिकेट’ दिसत असल्यास तो कोणत्या शाळेत आहे, हेही तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शिक्षक भरती अपडेट : राज्यात कमी पटसंख्येच्या शाळांवर होणार कंत्राटी शिक्षकांची भरती? शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

इयत्ता तिसरी विद्यार्थी

राज्यात सत्ता बदल झाल्या नंतर शिक्षक भरती संदर्भात हालचाली वाढल्या आहेत. या सोबतच शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे घोषित कारण्यात आला होता . मात्र शासनाच्या या निर्णयाला सर्व स्तरातून प्रखर विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे
आता आपला निर्णय बदलत कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करता, या शाळावरती कंत्राटी व सेवानिवृत्त शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सदर शाळांमधील सध्या कार्यरत सुमारे साडेतीन हजार शिक्षकांना दुसऱ्या शाळेत हलवले जाणार आहे.

कमी पटसंख्येच्या दोन सरकारी शाळांचे समायोजन होणार!

राज्य शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की ‘‘एकाच गावात कमी पटसंख्येच्या दोन सरकारी शाळा असल्यास, त्यांचे समायोजन केले जाईल. मात्र, दुर्गम भागातील कमी पटसंख्येच्या, अन्य पर्याय उपलब्ध नसलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत..”

दरम्यान काही शाळा बंद कारण्यात येणार असून, त्या शाळा विषयक निकष ठरविण्यात आले आहेत. यामध्ये ‘या’ सलग तीन वर्षे पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न होऊनही विद्यार्थी वाढले नाहीत किंवा पटसंख्या वाढीसाठी सतत प्रयत्न झाले, पण विद्यार्थी संख्या घटली किंवा 12-14 विद्यार्थी व तीन शिक्षक असणाऱ्या शाळा.किंवा जिल्हा परिषद शाळेपासून एक किलोमीटरमधील अनुदानित शाळा या बंद होऊ शकतात.