टीसी नसला, तरी शाळांत प्रवेश मिळणार! राज्य शासन निर्णय जारी.

टीसी नसला, तरी शाळांत प्रवेश मिळणार! राज्य शासन निर्णय जारी.शैक्षणिक अपडेट्स : राज्यातील अन्य शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा स्थलांतरीत विदयार्थ्यांच्या प्रवेशा संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णया नुसार कोणत्याही माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये अन्य शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी ( टीसी ) नाकारला जाणार नाही . शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

प्रवेश शिक्षणाचा हक्क अधिनियमात विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल , अशी तरतूद आहे . अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा , अशी तरतूद आहे . त्यानुसार , जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा , असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे . या शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही शासकीय , महापालिका , नगरपालिका , खासगी अनुदानित , कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या , तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात , तसेच माध्यमिक शाळेत इयत्ता नववी आणि
दहावीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल , अशा विद्यार्थ्यास शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी ( टीसी ) प्रवेश नाकारला जाणार नाही .

टीसीचे कारण देत , विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरुद्ध / मुख्याध्यापकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे . विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा विद्यार्थ्याची सरल पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल आणि जुनी शाळा सात दिवसांच्या आत विनंती मान्य करेल . शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्रप्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील , असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे .

जनगणना,निवडणुका नंतर आता शिक्षकांवर चहा वाटपाच्या नियोजनाची जबादारी… परिपत्रक जारी!

जनगणना,निवडणुका नंतर आता शिक्षकांवर चहा वाटपाच्या नियोजनाची जबादारी... परिपत्रक जारी!

शासनाच्या विविध उपक्रम किंवा महत्वाची कामे शिक्षक मंडळी कडून करून घेतली जातात. यामध्ये निवडणुकांची कामं किंवा जनगणनेच्या कामाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. मात्र आता चक्क शिक्षकांना चहा वाटपाच्या नियोजनाची जबादारी दिली असून या संदर्भातील एक परिपत्रक सुद्धा जारी कारण्यात आहे. सदर परिपत्रका नुसार शिक्षकांवर गणपती उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना चहा वाटपाच्या नियोजनाच्या कामची जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षकांना चहा हा एसटी आगारात वाटायचा आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत. सदर प्रकारावर अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून विरोधक या निर्णया बाबत सरकारवर कडाडून टीका करीत आहेत.

निर्णयाला शिक्षक संघटनांनी नोंदवीला आक्षेप….!

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर आगारात तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली आहे. दररोज तीन शिक्षक हे किमान आठ आठ तास एसटी आगारात ड्युटी करणार असून, राजापूर तालुक्यात जवळपास 850 शिक्षकापैकी 39 शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावण्यात आली आहे. हा निर्णय प्रांत आणि तहसीलदारांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांनी सांगितले आहे. मात्र, या निर्णयाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

जनगणना,निवडणुका नंतर आता शिक्षकांवर चहा वाटपाच्या नियोजनाची जबादारी... परिपत्रक जारी!

 

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर , पगारात होणार ” इतकी ” वाढ! 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर , पगारात होणार " इतकी " वाढ! शासन निर्णय : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ देत महागाई भत्ता 34 टक्क्यांवर नेला होता.त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सध्यस्थिला 31 टक्के महागाई भत्ता (DA) मिळतो. काही दिवसांपूर्वी केंद्राच्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत होता. मात्र, आता तो 34 टक्के झाला आहे.. तसाच निर्णय आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यासाठी घेतला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांनाही आता 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.

17 लाख कर्मचाऱ्यांना होणार थेट लाभ…

राज्य सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाचा मुळे राज्य शासनाच्या सेवेतील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे. महाराष्ट्र शासनातील कर्मचाऱ्यांसोबतच जिल्हा व नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगाचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले. यानुसार क्लास -1 अधिकाऱ्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. अधिकाऱ्यांच्या वेतनात 30 ते 40 हजार रुपयांची वाढ होणार आहे. तर क्लास-2 मधील अधिकाऱ्यांना 20 ते 30 हजार रुपयांचा फायदा होईल. याशिवाय क्लास-3 मधील अधिकाऱ्यांना 10 ते 15 हजार रुपयांचा फायदा वेतनात होणार आहे.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे.

लवकरच तिसरा हप्ता कर्मचाऱ्यांना मिळणार…

दरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ‘एरियर’ म्हणून 5 हप्ते देण्याचीही घोषणा केली होती. यानुसार सरकारकडून आतापर्यंत 2 हप्ते देण्यात आले असून, आता लवकरच तिसरा हप्ता या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

 

सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार भत्ता , महाविकास आघाडी सरकारचा सर्वात मोठा निर्णय. पात्रतेची नियमावली शासनाकडून जाहिर. 

सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार भत्ता , महाविकास आघाडी सरकारचा सर्वात मोठा निर्णय. पात्रतेची नियमावली शासनाकडून जाहिर. शासन निर्णय 2022 अपडेट : महाराष्ट्रात ठाकरे सरकारने ( thackeray government ) सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वय वर्ष १८ ते ४५ या दरम्यान बेरोजगार असलेल्या तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सेवायोजन कार्यालयाकडे ४५ लाख बेरोजगार युवक-युवतींची नोंद आहे. सरकारच्या या निर्णया नुसार नोकरी मिळेपर्यंत त्यांच्या किमान गरजा भागविण्यासाठी त्यांना दरमहा रुपये ५,००० आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकरिता शासनाने नियमावली ठरवली आहे.

नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थ संकल्पिय अधिवेशनात या विधेयकाला मंजुरी मिळालीय. त्यामुळे लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होऊन याचा लाभ सुमारे ४५ लाख बेरोजगार युवक/युवतींना होणार आहे.

शासकीय नियमावली नुसार बेरोजगार व्यक्ती कोण?

रोजगार नसलेली परंतु रोजगार मिळावी अशी इच्छा असलेली व्यक्ती, रोजगार मिळविणेसाठी आवश्यक ते प्रयत्न करूनही रोजगार न मिळालेली व्यक्ती

शासकीय नियमावली नुसार बेरोजगारी भत्ता देणेबाबत नियमावली

  • बेरोजगार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • त्या व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ४० वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • अर्जदाराने राज्याच्या सेवायोजन केंद्रात नाव नोंदविणे आवश्यक, अशी नाव नोंदणी झालेल्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत तिला नोकरी मिळालेली नाही अशी व्यक्ती.
  • किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी/उच्च माध्यमिक/पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर इतकी असावी.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.

शासकीय नियमावली नुसार बेरोजगारीचे प्रकार कोणते?

शासकीय नियमावली नुसार बेरोजगारीचे प्रकार खालील प्रमाणे प्रकार जाहीर करण्यात आले असून, यात येणाऱ्या तरुणांनाच बेरोजगार भत्ता मिळणार आहे.

  • खुली बेरोजगारी : काम करणेची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल अशी बेरोजगारी
  • हंगामी बेरोजगारी : शेतीची नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.
  • अदृश्य/प्रच्छन/छुपी बेरोजगारी : आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्तीचे व्यक्ती अदृश्य / प्रच्छन्न / छुपेपणे बेरोजगार असतील.
  • कमी प्रतीची बेरोजगारी : एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / कार्यक्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागणे अशी बेरोजगारी
  • सुशिक्षित बेरोजगारी : सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हाची बेरोजगारी
  • संरचनात्मक बेरोजगारी : उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी

योजना राज्य शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत राबविण्यात येणार

या योजने नुसार पात्र बेरोजगार व्यक्तीला दरमहा रुपये ५,००० इतका भत्ता देणेची योजना राज्य शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर केंद्रे उभारणीत येणार आहेत. यामध्ये –

1) राज्य पातळीवर एक केंद्र ,

2) प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एक शाखा,

3) प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये एक उपशाखा स्थापन होणार.

सदर योजनेतील बेरोजगारी भत्ता शाखेची कामे ठरवून देण्यात आली असून त्यानुसार – 

  • बेरोजगारी भत्त्यांसाठी आलेले अर्ज स्वीकारून भत्त्यांसाठी पात्रता आहे किंवा नाही हे तपासणे.
  • जिल्ह्याच्या सेवायोजन विभागात नोंदणी झालेल्या व्यक्तीला नाव नोंदणी दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत ज्यांना नोकरी मिळाली नाही अशा बेरोजगार व्यक्तींची यादी मागवून त्यांची नोंद करणे.
  •  जिल्ह्यातील बेरोजगार व्यक्तींची अद्यावत यादी तयार करणे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडून प्रस्ताव मान्य झाल्यानंतर ज्यांना बेरोजगार भत्ता देण्यात येईल अशा व्यक्तींची नावे संबंधित जिल्हाधिकारी / तहसीलदारांना कळविणे.
  • साधनांच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या बेरोजगार व्यक्तीला ५,००० रुपये फक्त एवढ्या रकमेचा बेरोजगारी भत्ता देण्यात येईल.

बेरोजगार भत्ता केव्हा बंद होईल? 

भत्ता मिळणाऱ्या प्रत्येक बेरोजगार व्यक्तीनी नोकरी मिळाल्यानंतर त्वरित तालुक्यातील/ जिल्ह्यातील बेरोजगारी भत्ता शाखेला कळविले पाहिजे. त्यानंतर हा भत्ता बंद करण्यात येईल.

खोटी माहिती किंवा फसवणूक केल्यास होणार कार्यवाही! 

नोकरी लागलेल्या व्यक्तीने तशी माहिती न देता भत्ता मिळविणे सुरूच ठेवून शासनाची फसवणूक केल्यास त्या व्यक्तीला ३ वर्षापर्यंत कारावास किंवा ५० हजार रुपये इतका दंड होऊ शकेल.