शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात महत्वाचे अपडेट, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा !

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात महत्वाचे अपडेट, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा !

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. माघील अनेक दिवसापासून राज्य सरकार राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्याबाबत विचार करत होत. मात्र अशातच आता राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत. अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

दरम्यान शिक्षकांच्या बदल्या विषयी पुढे बोलताना त्यांनी, या बदल्या न करण्याचे कारण स्पष्ट केले आहे. तीन वर्षांनंतर शिक्षकाची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारणेत खंड पडतो. ही बाब विचारात घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शाळांतील शिक्षकांच्या नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत. मात्र जर एखाद्या शिक्षकाला बदली करायचीच झाल्यास त्यासाठी विशेब बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाला अपवाद केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिक्षकांच्या नियमित बदल्या आदेश लवकरच काढण्यात येणार

शिक्षकांच्या नियमित बदल्या संदर्भात लवकरच आदेश काढण्यात येणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभाग, शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. शालेय जीवनात मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यात शिक्षकांची भूमिका देखील महत्त्वाची असते. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे शिक्षक त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे मोलाचे काम करत असतात. मात्र दर तीन वर्षांनी शिक्षकाची बदली झाली तर यामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे यापुढे नियमित बदल्या न करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला असल्याचे सांगितले.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता / DA फरक अदा करण्यासाठी अनुदान वितरण करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR पहा

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता / DA फरक अदा करण्यासाठी अनुदान वितरण करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR पहा

तुम्ही जर राज्य कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची खुशखबर आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2023 ते जून 2023 चे वेतन , अतिरिक्त कार्यभार , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.04.05.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर जीआर नुसार राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे एप्रिल 2023 ते जुन 2023 चे वेतन व वेतनावरील बाबीकरीता अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत सहपत्र शासनास विनंती करण्यात आलेली होती . त्यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित केलेल्या निधीपैकी बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या निधी मधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन या बाबीकरीता माहे एप्रिल ते जून 2023 चे वेतन व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

शासन निर्णय डाउनलोड कराक्लिक करा 

यानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2023 ते माहे जून 2023 चे वेतन व वेतनावरील बाबींकरीता एकुण 9,20,900/- इतके अनुदान या उद्दिष्टाखाली मुंबई यांच्याकडे वित्त विभागाच्या अटी व शर्तीनुसार माहे माच्र 2023 चे वेतन , महागाई भत्ता फरक मार्च 2023 व वेतनावरील बाबींकरीता 10 टक्के नुसार वितरीत निधी बिम्स प्रणालीनुसार उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे .

सदर तरतुद सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई यांच्याकडे सुपुर्द करण्यास देत असून याकरीता अवर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी तर सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील असा आदेश सदर निर्णयान्वये देण्यात आलेला आहे .

या संदर्भातील अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.04 मे 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

 शासन निर्णय डाउनलोड करा क्लिक करा 

सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, सेवा निवृत्तीच्या वयोमर्यादेत (Retirement Age) वाढ होणार!

सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, सेवा निवृत्तीच्या वयोमर्यादेत (Retirement Age) वाढ होणार!

Retirement Age | सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण भारतातील निवृत्तीची वयोमर्यादा (Retirement Age) वाढण्याची जास्त शक्यता . भारत सरकारच्या ईपीएफओला (EPFO) या संस्थेने वयोमर्यादा वाढवण्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे निवृत्तीच्या वयोमर्यादेचा (Age Limit) संबंध या परिस्थितीशी जोडण्याची गरज आहे, असे ईपीएफओचे मत आहे.

आघाडीच्या दै. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ च्या वृत्तानुसार, येत्या काळात देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येत होणारी वाढ आणि जगण्यासाठी परिस्थिती अधिक अनुकूल होत आहे.
येत्या काही काळात लोकसंख्येचा मोठा हिस्सा निवृत्तीच्या वयोमर्यादेत येईल. परिणामी पेन्शन फंडावरील (Pension Fund) भार लक्षणीयरित्या वाढेल, असे ईपीएफओला वाटते. त्यामुळे भारत सरकार लवकरच वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान एका रिपोर्ट नुसार देशातील 14 कोटी नागरीक होणार रिटायर होणार आहेत. ईपीएफओने व्हिजन डॉक्युमेंट 2047 तयार केले आहे. 2047 सालापर्यंत भारतात अंदाजे 14 कोटी नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असतील, असा अंदाज आहे. यामुळे पेन्शन फंडावरील दबाव लक्षणीय रित्या वाढेल.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे शासननिर्णय रद्द; शिक्षकांच्या बदल्या लांबणार, सविस्तर वृत्त वाचा .

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे शासननिर्णय रद्द; शिक्षकांच्या बदल्या लांबणार, सविस्तर वृत्त वाचा .

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यां संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य शासनाने यापूर्वी काढलेले सर्व शासननिर्णय रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे पुढील वर्षाच्या बदल्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत शासन निर्णय काढण्याच्या दृष्टीने सल्ला देण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारी संपामुळे सध्या सुरू असलेली प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू राहणार की, थांबणार यावरून संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने 4 एप्रिल 2020 रोजी शासननिर्णय जारी केला. शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. हा शासननिर्णय रद्द करण्यात आला आहे. 7 एप्रिल 2021 रोजीच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय बदलीप्रक्रियेचा अभ्यास करून त्यामध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यात काय सुधारणा कराव्यात, या संदर्भात धोरण निश्चित करणे गरजेचे आहे.

याबाबतचा अभ्यास करून त्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी शासनाने स्वतंत्र अभ्यासगट गठीत करण्यात करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे हे अध्यक्ष आहेत. समितीत नाशिक बीड, उपसचिव, जिल्हा परिषद आस्थापना, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तर, सचिव म्हणून अवर सचिव, आस्था 14 कार्यासन, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई असणार आहे.

शिक्षकांच्या बदल्या लांबणार

बदल्यांचा शासननिर्णय रद्द करण्यात आल्यामुळे नवीन शासननिर्णय येईपर्यंत शिक्षकांना बदल्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मार्च अखेरपर्यंत निवेदने स्वीकारली जाणार असल्याने त्यानंतर अभ्यासगट योग्य त्या शिफारसी करेल. शासनाने अभ्यासगटाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर शासननिर्णय काढण्यात येईल व त्यानंतरच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे या प्रक्रियेसाठी किती कालावधी लागणार आहेत, हे निश्चित नसल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.

शिक्षक बदल्यासाठी अभ्यासगटाची स्थापना

या अभ्यासगटाने प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच, काम करताना त्यांना बदल्यांसंदर्भात येणाऱया अनुभवांचा उपयोग करून व प्रातिनिधिक शिक्षक संघटनांकडून चर्चेमधून प्राप्त होणारी माहिती या संदर्भातील विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेले निर्देश, संगणकीय प्रणाली तयार करणाऱया अधिकाऱयांना 2022ची प्रक्रिया राबविताना आलेल्या अडचणी, 2022ची प्रक्रिया राबविताना शासनाने वेळोवेळी दिलेली स्पष्टीकरणे, याचा तौलनिक अभ्यास करून वरील शासननिर्णयानुसार कार्यान्वित असलेल्या बदल्यांच्या धोरणासंदर्भात आवश्यक त्या शिफारशी करणे.

2023च्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचे संभावित वेळापत्रक सादर करणे अभिप्रेत आहे. याबाबतचा अहवाल या अभ्यासगटाने एका महिन्यात शासनास सादर करावयाचा आहे. या अभ्यासगटाच्या विचारार्थ सादर करावयाची निवेदने 27 ते 29 मार्च या कालावधीत ग्रामविकास विभागाकडे सादर करावीत. त्यानंतर प्राप्त झालेली निवेदने विचारात घेतली जाणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.