ऑनलाईन शिक्षक बदली 2022 – शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्यांबाबत मोठी अपडेट.

ऑनलाईन शिक्षक बदली 2022 - शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्यांबाबत मोठी अपडेट.

राज्यात शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरु झाले आहे. सदर बदल्यांची प्रक्रिया 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे संबंधित विभागकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात तांत्रिक बाबी या एप्रिल महिन्यात पूर्ण कारण्यात आल्या होत्या. शासनाकडून दिलेल्या निर्देशनुसार जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांनी 7 नोव्हेंबरपर्यंत आपली माहिती सादर केली आहे.

पुढील प्रोसेस म्हणून आता 24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग भाग एकमध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता लागणार आहे.

ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार 30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.

दरम्यान शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहणार आहे . तसेच विशेष संवर्ग भाग-दोनसाठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत आहे. या दरम्यान शिक्षकांना त्यांचे त्यात 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांची बदली होणार नाही. त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहणार आहे .

या शिक्षकांची बदली होणार नाही…

सदर ऑनलाईन बदली प्रोसेस मध्ये भाग घेऊन प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही. बदल्याची ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी बदल्यांचे आदेश प्रकाशित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मे महिन्यात शिक्षकांच्या होणार ऑनलाईन बदल्या , जाणून घ्या ‘ बदली ॲप ’ प्रणाली बद्दल! 

मे महिन्यात शिक्षकांच्या होणार ऑनलाईन बदल्या , जाणून घ्या ' बदली ॲप ’ प्रणाली बद्दल! शैक्षणिक अपडेट 2022 : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी एक मोबाईल ‘ॲप’ विकसित केले आहे. त्याचा मसुदा तयार झाला असून, येत्या दोन आठवड्यांत ‘ॲप’चे राहिलेले काम पूर्ण होणार आहे. मोबाईल, तसेच संगणकावरही हे ‘ॲप’ वापरता येईल. या ‘ॲप’च्या माध्यमातून येत्या मे महिन्यात ऑनलाइन पद्धतीने या बदल्या होणार आहेत. सदर ‘ॲप’ ची प्रणाली कसे काम करणार आहे, याबाबत जाणून घ्या.

बदली ॲप प्रणाली उपयोग….

  • मोबाईल, तसेच संगणकावरही हे ‘ॲप’ वापरता येईल.
  • मोबाइल ॲपवरून बदली प्रक्रिया होणार असल्याने हजारो शिक्षकांचा डोकेदुखी संपणार आहे.
  • बदलीसाठी या ॲपवरच सोप्या पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी, या ॲपवरच पाहता येणार आहे.
  • या ॲपचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
  • पहिल्या संवर्गाच्या बदल्या झाल्यानंतर पुढील संवर्गाच्या बदल्या टप्प्याटप्प्याने केल्या जाणार आहेत.
  • या बदलीची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शक असणार आहे.
  • प्रत्येक शिक्षकाला आपल्या मोबाइलवरच बदली प्रक्रियेची माहिती मिळणार असल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
  • त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक होण्यासाठी या ॲपचा उपयोग होणार आहे.