शिक्षकांसाठी महत्वाचे ! बदली झालेल्या शिक्षकांना “या” तारखेपर्यंत नवीन शाळेवर रुजू होण्याचे आदेश.

शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार नसल्याचे स्पष्ट!

शिक्षकांसाठी महत्वाचे ! बदली झालेल्या शिक्षकांना "या" तारखेपर्यंत नवीन शाळेवर रुजू होण्याचे आदेश.

प्राथमिक शिक्षकांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नवीन धोरणानुसार बदली झालेल्या शिक्षकांना येत्या १५ मेनंतर जुन्या शाळा सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नवीन शाळेवर रुजू होण्यासाठी सर्व शिक्षकांना ३१ मेची अंतिम मुदत देण्यात आली आहे. परिणामी बदल्यांबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. यामुळे यंदा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

कोरोना महासाथ, शिक्षकांच्या बदल्यांच्या नवीन धोरणांची अंमलबजावणी आणि या बदल्यांसाठी नव्याने विकसित करण्यात आलेली संगणकीय प्रणाली यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या झाल्या नव्हत्या. बदल्यांबाबतच्या नव्या धोरणानुसार यंदा पहिल्यांदाच जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.