शिष्यवृत्ती परीक्षा अपडेट 2022 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे वतीने घेण्यात येणारी इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती माघील दोन महिन्यापासून लांबणीवर पडली होती. मात्र आता शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला असून, जून महिन्यात इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत लवकरच अधिकृतरित्या परिपत्रक काढून सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे कडून ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरता आले नाहीत, त्यांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहेत. दरम्यान टीईट परीक्षा पेपर फुटी प्रकारामुळे सदर परीक्षा ही कोणत्या कंपनी मार्फत घ्यायची या बाबत चाचपनी सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणे होते. आता विनर कंपनीच्या सहकार्याने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. लवकरच पेपर छपाईचे काम सुरु करून सदर परीक्षा ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे नियोजन आहे. सदर शिष्यवृत्ती परीक्षेला इयत्ता ५ वीचे ४,१०,३९५ व इयत्ता ८ वीचे २ ,९९ ,२५५ विदयार्थ्यांनी आपले नाव नोंदणी केली आहे.