पात्र विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा एक हजार स्कॉलरशिप.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वीच्या ( Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) ) विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिष्यवृत्तीसाठी २३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत आहे. २ सप्टेंबरपर्यंत विलंब शुल्कासह मुभा आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विदयार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा १० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र विदयार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
हेही वाचा-
अर्ज भरण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्ती पात्र विद्याथ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इयत्ता नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दहावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे उत्पन्न ३ लाख ५० हजारपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत. राज्यातील
- कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात तसेच विद्यार्थ्याला इयत्ता सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा,
- अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) मधील विद्यार्थ्यांनी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असावे .
- विनानुदानित शाळेत, केंद्रीय विद्यालयात, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी आणि सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.