शैक्षणिक अपडेट : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करीत असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था याबाबत विचार विनिमय सुरु आहे.
पाठ्यपुस्तकातच लिखाणासाठी वहीचा पर्याय मिळाल्यास, विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे व विद्यार्थ्यांना नोटस् काढण्यासाठी स्वतंत्रपणे वही बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय, एकाच विषयाची किंवा संदर्भातील वेगवेगळी टिपणे काढण्यापासून विद्यार्थ्यांची सुटका होईल. पालकांचा वह्यांवर होणारा खर्चही वाचेल.
–दिपक केसरकर , शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांनी एकात्मिक पुस्तक संकल्पना मांडली होती. या संकल्पनेत विविध विषयांचे धडे एकत्र करून त्याचे एकच पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो माघे पडत गेला, आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकाची विभागणी तीन भागांत करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, पुस्तकांची विभागणी केल्यानंतरही वह्यांच्या ओझ्याचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे तीन भागात विभागणी केलेल्या पाठ्यपुस्तकालाच वहीची पाने जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.