Sukanya Samrudhi Yojana 2022 | सुकन्या समृध्दी योजना 2022 | PM Kanya Yojana

Sukanya Samrudhi Yojana 2022 | सुकन्या समृध्दी योजना 2022 | PM Kanya YojanaSukanya Samrudhi Yojana (SSY) | सुकन्या समृध्दी योजना

केंद्र सरकारच्या अनेक शासकीय योजना पैकी उत्तम शासकीय योजना म्हणून आज, सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samrudhi Yojan ) ओळखली जाते. सदर योजना नेमकी कशी आहे? तीचे स्वरूप कसे आहे? सुकन्या समृद्धी योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय लागते? याचा नक्की फायदा काय या बाबत सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

सुकन्या समृद्धी योजना स्वरूप ( Sukanya Samrudhi Yojan Format )

सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samrudhi Yojan ) ही केंद्र सरकार पुरस्कृत सरकारी योजना असून देशातील मुलींच्या उन्नतीसाठी सदर योजना सुरु कारण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबातील मुलींना बचत मिळवून देण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. SSY ची मुदत खाते उघडल्याच्या तारखेपासून किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीच्या लग्नापर्यंत 21 वर्षे झाल्या नंतर या योजचा परतावा / लाभ मिळतो.

सुकन्या समृद्धी योजना उद्देश ( Purpose of Sukanya Samrudhi Yojana )

  • भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. ही बचत योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, मुलगी 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडणे आवश्यक आहे.
  • या खात्यात किमान गुंतवणूक मर्यादा ₹250 आणि कमाल मर्यादा ₹1.5 लाख आहे.
  • ही गुंतवणूक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येते. या योजनेद्वारे, गुंतवणुकीवर सरकारकडून 7.6% दराने व्याज दिले जाईल.
  • याशिवाय या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर करात सूटही दिली जाईल. ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली अल्प बचत योजना आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजना प्रोसेस कशी करावी? ( How to process Sukanya Samrudhi Yojana? )

  • सुकन्या समृद्धी योजनेतील खाते पोस्ट ऑफिस किंवा व्यावसायिक शाखेच्या कोणत्याही अधिकृत शाखेत उघडता येते.
  • मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत सुकन्या समृद्धी खाते ऑपरेट केले जाऊ शकते.
  • मुलीच्या उच्च शिक्षणासाठी वयाच्या १८ व्या वर्षानंतर ५०% रक्कम काढता येते.
सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्ये ( Features of Sukanya Samrudhi Yojana )

1) प्रारंभिक गुंतवणूक रुपये २५०/

2) ० ते १० वयोगटातील मुली खाते उघडण्यास पात्र.

3) नैसर्गिक किवा कायदेशिर पालक आवश्यक.

4) त्या नंतर रुपये १०/- च्या पटीत कितीही वेळा रक्कम जमा करता येते.

5) एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त रु. १५००००/- पर्यंत जमा करण्याची मर्यादा.

6) १५ वर्ष रक्कम भरा. खाते २१ वर्षांनी परिपक्व.

7) मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर मुदतपूर्व खाते बंद करण्याची

सुविधा.

8) आवश्यक कागदपत्रे पालकाचे के. वाय. सी. आणि मुलीचा जन्म दाखला.

9) सेक्शन ८० सी अंतर्गत आयकरात सुट.

10) ५ वर्षानंतर ठराविक परिस्थितीत (आजारपण, पालकांचा मृत्यू) मध्ये खाते बंद करता येते.

विशेष मोहिमेदरम्यान सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याकरिता नजीकच्या पोस्ट ऑफिसला किंवा आपल्या पोस्टमन सोबत संपर्क साधा.