इयत्ता 10वी, 12वीच्या विदयार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक नवीन जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून २३ मार्च २०२४पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत होईल.SSC HSC Bord Exam 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) व्यवसाय अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार, दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होतील.
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाई परीक्षा (१२वी) – बुधवार, दि. २० मार्च ते शनिवार, दि. २३ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.
तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) – शुक्रवार, दि. १ मार्च २०२४ ते मंगळवारी, दि. २६ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे.
तसेच दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४ आणि १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.