बारावी परीक्षेचा ‘हा’ पेपर फुटला, क्लासेसच्या प्रोफेसर अटक!

बारावी परीक्षेचा 'हा' पेपर फुटला, क्लासेसच्या प्रोफेसर अटक!राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहेत. मुंबईत बारावीचा रसायन शास्त्राचा (Chemistry) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत असल्या तरी देखील मुंबईत बारावीचा हा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे. या पेपरफुटीप्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण व्हॉट्सॲप चॅटवरून पुढे आले व त्यातून पेपरफुटल्याचे सिद्ध झाले आहे. विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक पेपरसाठी विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आहे.

दरम्यान कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना हा पेपर आधीच मिळाला होता. पेपर व्हायरल करणा-या तीन विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटल्या नंतर परीक्षा सिस्टीमवर प्रश्न निर्माण झाले होते. आता या निमित्त पुन्हा एकदा मंडळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुकेश यादवसोबत आणखी कोणाचा यात सहभाग ?

पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याची चौकशी सुरू आहे. टीईटी, लष्कर भरतीपासून परिक्षांमध्ये घोटाळे झाल्यानंतर आता पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, याचीही माहिती घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.