HSC Result 2022 : इयत्ता १२ वी चा आज निकाल जाहीर होणार! येथे पहाता येणार निकाल.

HSC Result 2022 : Result of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education in March-April 2022 Higher Secondary Certificate Exam Will be announced online. Students will be able to view their results on the official website with mahresult.nic.in at 1 pm.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल आज दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होणार आहे . विद्यार्थी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in सह अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकणार आहेत.

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2022 विभाग 

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळा वरती आपला निकाल पाहता येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ :

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

https://mahresults.org.in

https://lokmat.news18.com

https://www.indiatoday.in/education-today/results

https://mh12.abpmajha.com

https://www.tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th

 

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट ; निकालाच्या तारखा संदर्भात शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती जाहीर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट ; निकालाच्या तारखा संदर्भात शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती जाहीरशैक्षणिक अपडेट : राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या असून आता विद्यार्थ्यांसह पालकांचे सारे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान , दहावी-बारावीच्या निकाला बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाची माहिती जाहीर केली आहे. शेवटचा पेपर झाल्यानंतर 60 दिवसांत निकाल जाहीर करणं बंधनकारक आहे. याबाबत शिक्षण मंडळाने नवीन माहिती जाहीर केली आहे. 

यंदा दहावी-बारावीच्या उशिरा लागणार अशी चिंता व्यक्त केली जात होती, त्याचे कारण पेपर तपासणीच्या कामावर शिक्षकांनी बहिष्कार घातला हाेता. मात्र जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करणार असल्याची खात्रीलायक माहिती बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संभाव्य तारखा.

बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत, दहावीचा 20 जूनपर्यंत लावण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात असून तशी तयारी सुरु असल्याचे समजते. अंतर्गत सूत्रानुसार ‘दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम जवळपास पूर्ण झालंय, त्यामुळे आता निकाल बनवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दहावी-बारावी परीक्षेचे निकाल वेळेतच म्हणजे 10 जूनपर्यंत बारावीचा, तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

  • दहावी परीक्षा कालावधी – 15 मार्च रोजी सुरु झाल्या व 4 एप्रिल रोजी संपल्या.
  • नोंदणी विद्यार्थी – एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
  • प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी – पैकी 8 लाख 89 हजार 584 मुले , तर 7 लाख 49 हजार 487 मुलीनी परीक्षा दिली आहे.
  • बारावी बोर्डाच्या परीक्षा कालावधी – 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या.
  • प्रत्यक्ष परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 14 लाख 85 हजार 826