राज्य सरकार कडून नीट ( NEET ), जेईई ( JEE )स्पर्धा पूर्वपरीक्षेसाठी १५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन मार्गदर्शन , दररोज ६ जीबी इंटरनेटही मोफत.

राज्य सरकार कडून नीट ( NEET ), जेईई ( JEE )स्पर्धा पूर्वपरीक्षेसाठी १५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन मार्गदर्शन , दररोज ६ जीबी इंटरनेटही मोफत.महाज्योती प्रशिक्षण : राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘ महाज्योती मार्फत राज्यातील १५ हजार ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नीट ( NEET ) , जेईई ( JEE ) स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्य सरकार कडून महाज्योती अंतर्गत नीट ( NEET ), जेईई ( JEE ) स्पर्धा पूर्वपरीक्षेसाठी १५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कारण्यात येणार असून, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना दररोज ६ जीबी इंटरनेटही मोफत देण्यात येणार असल्याचे माहिती महाज्योतीचे संचालक प्रा . दिवाकर गमे यांनी दिली. महाज्योतीचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

१ मे रोजीपासून नोंदणी ( Registration ) सुरु.

१ मे रोजीपासून नोंदणी सुरु मार्च २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या व ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन २०२४ च्या जेईई , नीट परीक्षेची तयारी करण्यास इच्छुक ओबीसी व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर १ मे २०२२ पासून मोफत नोंदणी सुरू झाली आहे .

आवश्यक कागपत्रे – सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहेत.

  • शहरी भागातील विद्यार्थ्यांना मार्च २०२२ च्या दहावीच्या परीक्षेत ७० टक्के तर , ग्रामीण व आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण मिळणे आवश्यक .
  • विद्यार्थ्याने ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे शाळा , महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे बोनाफाईड सर्टिफिकेट , विद्यार्थी ओबीसी , व्हीजेएनटी , एसबीसी जात व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र.

१५ हजार विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट!

२०२४ साठी १५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण २०२२ च्या जेईई , नीट परीक्षेसाठी तीन हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मोफत टॅबसह प्रशिक्षण देण्यात आले .
२०२३ च्या नीट परीक्षेसाठी १० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे .
२०२४ साठी १५ हजार विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे .
जेईई , नीट परीक्षेची आवश्यक सर्व पुस्तके मोफत घरपोच पाठविली जाणार आहेत .
पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा ३१ हजार रुपयांप्रमाणे पाच वर्षे फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे .