Maharashtra Board HSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल. विद्यार्थी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in सह अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकणार आहेत. 12वी ची परीक्षा यंदा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आली होती. यंदा 15 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.
अधिकृत संकेतस्थळ :
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
https://mahresults.org.in
https://lokmat.news18.com
https://www.indiatoday.in/education-today/results
https://mh12.abpmajha.com
https://www.tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th