दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र! जाणून घ्या संपूर्ण बातमी

राज्यात सध्या दहावी बारावीच्या परीक्षे संदर्भात सातत्याने कधी नाहीती एवढी चर्चा होताना दिसत आहे. याचे करणारही तसेच आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी विरोध आहे. त्यात आणखीन कोरोनाचा प्रादुर्भाव कामी झाला नाही त्यामुळे प्रशासन ही खबदारी घेताना दिसत आहे. या वर्षी ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ असणार आहेत. त्या केंद्रांवर तथा उपकेंद्रांवर एका वर्गात 25 विद्यार्थीच असतील. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील (परीक्षा केंद्र) सोयी-सुविधांबद्दल मुख्याध्यापकांना हमीपत्र सादर करावे लागणार असल्याचे , बोर्डाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

महाविद्यालयातील परीक्षार्थी, एकूण बाकांची संख्या, पाण्याची, वीज, पंखा, जनरेटर, इनव्हर्टर, मुला-मुलींची स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय, शिक्षक, लिपिकांची संख्या, मागच्या वर्षी परीक्षेचे मुख्य केंद्र कोणते होते, याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना द्यावी लागणार आहे.

दरम्यान ऑनलाईन परीक्षाचा जोर कमी पडला असून विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर शरद गोसावीयांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे परीक्षा या वेळेतच होतील आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे होतील त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाली असून 3 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. त्यानंतर 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत त्यांची लेखी परीक्षा होईल. तत्पूर्वी, दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत चालेल. 15 मार्चपासून सुरु झालेली दहावीची लेखी परीक्षा 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे.