TAIT UPDATES 2022 : शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरुणासाठी आनंदाची बातमी आहे, शिक्षक भरतीसाठी अवशक शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा ( TAIT ) 2022 ही आता एप्रिल महिण्यात घेण्यात येणार असल्याचे पवित्र पोर्टलकडून जाहीर केले आहे. याबाबत अधिकृत सूचना पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आली असून सदत परीक्षा घेण्यासाठीची सुरु असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. 2017 नंतर दुसऱ्या TAIT परीक्षाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. यामुळे आता दिलासा मिळणार आहे.
पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध सूचना
याशिवाय माघील भरतीतील उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामध्ये दिनांक ०२ / ० ९ / २०२१ रोजी खाजगी व्यवस्थापनाच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे .
१. आज अखेर २६२ संस्थाकडून ७८ ९ उमेदवारांची निवड केल्याची नोंद करण्यात आलेली आहे . निवड झालेल्या सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन उर्वरित पदाच्या निवडी विषयक प्रसिद्धीची कार्यवाही दिनांक १५/०२/२०२२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनांना निर्देश देण्यात आलेले आहेत .
२. शिक्षक पदभरती पोर्टलवर उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र करण्याविषयीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात भरलेली माहिती अंतिम करण्याची सुविधा दिली जाणार आहे . या आधारावरच व्यवस्थापनाच्या पसंतीक्रम / प्राधान्यक्रम घेतले जातील व त्यानंतर पुढील निकालाची कार्यवाही केली जाईल .
३. TAIT – 2022 एप्रिलमध्ये घेण्याविषयीची कार्यवाही सुरु आहे .
इत्यादी सूचना आज पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.