सोलापूर जिल्ह्यात तब्बल 171 बोगस शिक्षक! TET सर्टिफिकेट च्या पडताळणीत धाकादायक माहिती समोर.

सोलापूर जिल्ह्यात तब्बल 171 बोगस शिक्षक! TET सर्टिफिकेट च्या पडताळणीत धाकादायक माहिती समोर.राज्यात बोगस TET सर्टिफिकेटच्या सह्याने नोकरी मिळवणारे तब्बल 7,880 शिक्षक असल्याचे समोर आले आहे. काल एका खाजगी वृत्तवाहिनीने जिल्हा निह्याय बोगस शिक्षक संख्या जाहीर केली असून, या नुसार सोलापूर जिल्ह्यात 171 बोगस शिक्षक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र हदरून गेले आहे. सदर माहिती ही TET सर्टिफिकेट च्या पडताळणीत धाकादायक समोर आली आहे . आता नेमके कोण हे शिक्षक आणि कोणत्या शाळेवर हे कार्यरत आहेत, हेही लवकरच समोर येईल.

बोगस शिक्षक आकडेवारी नुसार एकट्या नाशिक 1154 बोगस शिक्षक कार्यरत असल्याचे समोर आले आहे. तसेच वेगवेगळ्या जिल्ह्याची आकडेवारी नुसार मुंबई दक्षिण – 40, मुंबई पश्चिम – 63, मुंबई उत्तर – 60, रायगड – 42, ठाणे – 557, पालघर – 176, पुणे -395, अहमदनगर – 149 , सोलापूर – 171, नाशिक – 1154 , धुळे – 1002, जळगाव – 614, नंदुरबार – 808, कोल्हापूर – 126, सातारा – 58, सांगली – 123, रत्नागिरी – 37, सिंधुदुर्ग – 22, औरंगाबाद – 458, जालना – 114, बीड – 338,

परभणी – 163, हिंगोली – 43, अमरावती – 173, बुलढाणा – 340, अकोला – 143, वाशिम – 80, यवतमाळ – 70, नागपूर – 52, भंडारा – 15, गोंदिया – 09, वर्धा – 16, चंद्रपूर – 10, गडचिरोली – 10, लातूर – 157, उस्मानाबाद – 46, नांदेड – 259 अशी धाकादायक आकडेवारी समोर आली आहे. आता या बोगस शिक्षकांवर लवकर कार्यवाही करून विदयार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे.