महाराष्ट्रात ५० हजार पदांची मोठी ” योजनादूत ” भरती, असा करा अर्ज , नवीन प्रकाशित GR डाउनलोड करा !

महाराष्ट्रात ५० हजार पदांची मोठी " योजनादूत " भरती, असा करा अर्ज , नवीन प्रकाशित GR डाउनलोड करा !महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या दृष्टीने महत्वाची बातमी आहे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास उक्त संदर्भाधीन दि. ९ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ६ नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५०,००० योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.

योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच, योजनादूतांच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपध्दती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र सरकार ने विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी ५०,००० युवकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ‘योजना दूत’ नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत करतील, असे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य विधान परिषदेत सांगितले.

डाउनलोड GR योजनादूत भरती : क्लिक करा