जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरुपी एकाच शाळेत नोकरी करता येणार, महाराष्ट्र सरकारच नवीन धोरण

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरुपी एकाच शाळेत नोकरी करता येणार, महाराष्ट्र सरकारच नवीन धोरण

सरकारी शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचं झंझट कायमचं संपवाण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. खासगी शाळांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरुपी एकाच शाळेत नोकरी करता येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून सरकारी शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचं झंझट कायमचं संपणार आहेत, कारण जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याच होऊ नयेत, यासाठी नवं धोरण करण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले आहेत.

संदर्भात शिक्षण मंत्री किती सरकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार, शिक्षकांवरील बोजा कमी व्हावा, त्याचबरोबर शिक्षक एकाच जागी थांबून मुलांना चांगल्यारीतीने शिक्षण देतील अशी व्यवस्था निर्माण करणं अशी सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा करावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वांचे डोळे सरकारच्या निर्णयाकडे लावून राहिले आहेत.

दरम्यान शिक्षकांच्या बदल्या न करण्याचं धोरण राज्य सरकार का आणतंय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळं शिक्षक कायम त्रासलेले असतात. या त्रासातून शिक्षकांना कायमचा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी व्हावा, यासाठी हे धोरण आखलं जातंय. माध्यमिक आणि खासगी शाळांमध्ये आयुष्यभर शिक्षक एकाच शाळेत शिकवतात. त्याच धरतीवर शिक्षकांना एकाच शाळेत थांबून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता येईल, असं शालेय शिक्षण खात्याला वाटतं. मात्र या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 

Spread the love

Leave a Comment