शैक्षणिक अपडेट : राज्यात TET पेपर फुटीच्या प्रकारा नंतर शासनाकडून मोठया प्रमाणात कार्यवाही होताना दिसत आहे. शिक्षण विभागा कडून शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) प्रमाणपत्र चौकशीचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यातील जबाबदार अधिकारी वर्गाला प्रत्येक तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळामधील शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) उत्तीर्ण शिक्षकांची मूळ प्रमाणपत्रे पडताळणी साठी जमा करण्यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर आदेश परिपत्रका नुसार मा . संचालक यांची व्हीसी मधील सूचना दिनांक 04.01.2022 . उपरोक्त संदर्भिय विषयान्वये मा . संचालक महोदय यांनी दिनांक 04.01.2022 च्या व्हीसी मध्ये सांगितल्यानुसार दिनांक 13.02.2013 नंतर सेवेत TET पात्रता प्रमाणपत्र आधारे रुजू झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी तातडीने करावयाची आहे . तेव्हा आपल्या तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळामधील शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) उत्तीर्ण शिक्षकांची मूळ प्रमाणपत्रे पडताळणी साठी दिनांक 05.01.2022 रोजी सायंकाळी 5.00 वा . पर्यंत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी येथे प्राप्त होणे गरजेचे आहे .
तेंव्हा आपण आपल्या तालुक्यातील अपेक्षीत सर्व मुळ प्रमाणपत्रे हस्तगत करून वेळेत आपण स्वतः दाखल करावीत . सर्व मुख्याध्यापकांनी या कामी विनाविलंब सदर प्रमाणपत्रे संबंधित तालूक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांचेकडे पोहच करावीत . गटशिक्षणाधिकारी यांनी या कामी एका खास व्यक्तीची नेमणूक करुन कामाचा पाठपुरावा करावा व प्रमाणपत्र दाखल करावीत असे स्पष्ट केले आहे. सदर प्राप्त प्रमाणपत्रे सोबतच्या नमुण्यात यादीसह सादर करावयाची आहेत.