रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4660 जागांसाठी मेगा भरती, १०वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी.

रेल्वे सुरक्षा दलामध्ये 4660 जागांसाठी मेगा भरती, १०वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी.

रेल्वे संरक्षण दल अंतर्गत “उपनिरीक्षक आणि हवालदार” पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

पदाचे नाव –
उपनिरीक्षक – 452
हवालदार – 4208

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा
18 – 25 वर्षे (हवालदार)
20 – 28 वर्षे (उपनिरीक्षक)

अर्ज शुल्क –
सामान्य – Rs.500/-
SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी – Rs.250/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट
https://indianrailways.gov.in/

PDF जाहिरात –  क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करा – क्लिक करा 

Spread the love

SSC HSC UPDATE 2024 – निकालापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट.

10वी बोर्ड निकाल 2023 जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माहितीनुसार दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे दहावी बरावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. SSC HSC 17 no. form examine fees

नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट पासून लागू

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. हे नवे दर प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 आणि मुख्य परीक्षा 2025 पासून लागू होणार आहेत

राज्य शिक्षण मंडळ कार्यकारी परिषदेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात 50 ते 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सदर निर्णयानंतर 17 नंबरचा परीक्षा अर्ज, नावनोंदणी शुल्कही महागलं आहे. 17 नंबरचा अर्ज/ फॉर्म भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नियमित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 420 रुपयांवरून 470 रुपये केलं आहे. तर, 17 नंबरच्या फॉर्ममध्ये 30 रुपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात 110 रुपयांची वाढ केली आहे.

Spread the love

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 524 पदांची सुधारित भरती जाहिरात प्रसिद्ध.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 524 पदांची सुधारित भरती जाहिरात प्रसिद्ध.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

महत्वाचे जॉब्स 👇

अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक

09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत

भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक

26 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

27 मे, 2024 रोजी आहे.

पदे व संख्या

(1) राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे),
(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे),
(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे),
(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे),
(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे),
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे),
(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),
(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),
(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे),
(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे),
(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),
(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),
(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),
(14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे),
(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे),
(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे),
(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे),
(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,
(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)
(3 ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल

संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे),
(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).

अधिकृत वेबसाईट – क्लिक करा 

जाहिरात पहा – क्लिक करा 

Spread the love

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालात अर्हताप्राप्त, शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

या परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तुषार विठ्ठल वाघ हे खुल्या व मागासवर्गवारीतू राज्यातून प्रथम आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सायली सातप्पा फासके ह्या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

Spread the love

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही शारिरिक चाचणी २४ मे ते ६ जून २०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता मैदान, अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शविल्याने शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम २४ मे, ते ६ जून, २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

शारीरिक चाचणीचा कार्यक्रम तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने यांची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करावा. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.

Spread the love

Naval Dockyard : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; लगेच अर्ज करा.

Naval Dockyard : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; लगेच अर्ज करा.

मोफत नोकरी विषयक अपडेट्ससाठी आमचा ग्रुप जॉईन करा👇

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Naval Dockyard : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे सध्या विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

पदसंख्या

301 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 8th/ 10th Pass/ ITI अशी आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा 14 ते 18 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 10 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

अर्ज पद्धत

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज https://registration.ind.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करा.

-उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

जाहिरात पहा – क्लिक करा 

Spread the love